पश्चिम रेल्वे (western railway) मुंबईतील जलद मार्गिकेवर म्हणजेच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर मजबूत असे सिमेंट स्लीपर (cement sleeper) बसवत आहे. यामुळे राजधानी, वंदे भारत आणि शताब्दी गाड्या त्यांच्या क्षमतेसह वेगाने धावतील. या गाड्या 160 किमी प्रतितास या वेगाने धावू शकतील.
भारतीय रेल्वे (Indian railway) मुंबई-अहमदाबाद-दिल्ली या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या 130 किमी प्रतितास वेगाने या गाड्या धावत आहेत. जर हा वेग 160 किमी प्रतितास झाला तर या मार्गावरील प्रवासाचा वेळ 30 ते 45 मिनिटे कमी होऊ शकतो. सध्या राजधानी ही सर्वात वेगवान रेल्वे आहे. जी मुंबईहून नवी दिल्ली पर्यंत धावते. ही रेल्वे जवळपास 1,386 किमी अंतर 15 तास 45 मिनिटांत कापते.
चर्चगेट-विरार मार्गावरील 5व्या आणि 6व्या मार्गावर म्हणजेच जलद मार्गांवर हे काम सुरू आहे. नूतनीकरण केलेल्या ट्रॅकमध्ये अचूक अंतर आणि मार्च 2023 मध्ये आलेल्या बॅलास्ट नावाच्या दगडांना फिट करण्यासाठी अमेरिकेत तयार केलेले ट्रॅक-रिलेइंग ट्रेन (TRT) वापरले आहे.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, टीआरटी मशीनचे हे काम 300 मजुरांच्या बरोबरीचे आहे. तसेच चर्चगेट (Churchgate) आणि विरार (Virar) दरम्यानच्या उपनगरीय विभागात अंदाजे 236 ट्रॅक किमी लांबीच्या 3.92 लाख काँक्रीट स्लीपरचे नूतनीकरण होणार आहे. तसेच सध्या अंधेरी ते बोरिवली दरम्यानच्या मार्गावर हे काम सुरू आहे.
“जूनच्या अखेरीपर्यंत, आम्ही सुमारे 57 ट्रॅक किमी लांबीच्या 95,000 काँक्रीट स्लीपरचे नूतनीकरण केले आहे,” पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. “हे काम रात्री केले जात आहे. संपूर्ण चर्चगेट-विरार मार्ग कव्हर करण्यासाठी आणि सर्व काँक्रीट स्लीपरचे नूतनीकरण पूर्ण करण्यासाठी TRT मशीन मुंबईत (mumbai) आणखी दोन वर्षे काम करणार आहे.
नवीन स्लीपरची खोली 230 मिमी आहे तर जुन्या स्लीपरची खोली 160 मिमी आहे. सूत्रांनी सांगितले की नवीन स्लीपरचे वजन सध्याच्या स्लीपरपेक्षा 25 टक्के जास्त आहे.
जवळपास एक दशकापूर्वी, रेल्वे गाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या पॉवरमध्ये 1,500 व्होल्ट डायरेक्ट करंट (DC) ट्रॅक्शन प्रणाली होती. म्हणूनच 1990 च्या दशकात डिझाइन केलेले काँक्रिट स्लीपर बसवले गेले. अल्टरनेटिंग करंट (AC) मध्ये रुपांतर केल्यानंतर, ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) केबल्सची उंची लवचिक झाली आहे. त्यामुळे अधिक मजबूत आणि खोल काँक्रीट स्लीपर बसवले जात आहेत.
हेही वाचा