राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रात ‘एनडीआरएफ’च्या १५ तुकड्या तैनात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात मागील ४८ तासापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यातील प्रमुख शहरामध्ये जनजीवन विसकळीत झाले आहेत. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सखल भागात पाणी साचले आहेत. तर नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.  त्यामुळेच एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण किनारपट्टीला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच पुढच्या काही तासात वादळी वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. राज्यसरकारकडून नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. याद्वारे “नागरिकांनी घरातच थांबावं. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशी विनंती केली आहे. सर्व आवश्यक खबरदारी घ्या आणि समुद्रकिनारी किंवा पाणी भरलेल्या परिसरात जाऊ नका. आवश्यकता लागल्यास १०० क्रमांकावर फोन करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं आवाहन सरकार तर्फे  केलं आहे. मुंबईत न थांबता मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोरदार मारा सुरु आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहेत. सखल भागातील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे.

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

गेल्या २४ तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला. डहाणू आणि महाबळेश्वर अनुक्रमे ३८३ मिमी आणि ३२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनुसार, गेल्या २४ तासात सांताक्रूझ येथे ८४ मिमी आणि कुलाबा येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिण गुजरातमध्ये चक्रीय चक्रवात तयार झाल्याने मुसळधार पाऊस झाल्याचं स्कायमेटच्या तज्ञांनी म्हटलं आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता एनडीआरएफने १५ तुकड्या महाराष्ट्रात तैनात करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ४ तुकड्या, सांगलीत २ तुकड्या, सातारात १ तुकडी, ठाणे १ तुकडी, पालघर १ तुकडी, मुंबईत ५ तुकड्या, नागपूरमध्ये १  अशा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  

पुढील बातमी
इतर बातम्या