चेंबूरमध्ये रुग्णवाहिका उड्डाणपुलाहून खाली पडली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या चेंबूर येथील अमर महल उड्डाणपूल येथून पुलाहून एक रुग्णवाहिका खाली पडल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. या अपघातात दोन जण जखमी जाले असून सुदैवाने त्यात कोणतिही जिवीत हानी झालेली नाही.महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी रुग्णवाहिका पुलाखालील एका दुकानावर कोसळली, तेव्हा ते दुकान बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दुकानातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळत आहे.

हेही वाचाः- सणासुदीला मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

जे.जे. रुग्णालयात येथून ही रुग्णवाहिका रात्री ८.३० च्या सुमारास एक मृतदेह घेऊन पूर्व उपनगरात जात होती. रात्रीचा वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दीकमी असल्यामुळे रुग्णवाहिका चालक गाडी वेगात चालवत होता. चेंबूरच्या अमर महल उड्डाणपुलावर त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिका उड्डाणपूलाहून खाली दुकानांवर पडली. अनलाॅकडाऊनचे तिसरे चरण सुरू असल्यामुळे दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका ज्या दुकानावर पडली ते दुकान बंद असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

हेही वाचाः- गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

या अपघातात चालक आणि इतर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, रुग्णवाहिकेतून घेऊन जाणारा मृतदेह कोरोनाबाधिताचा होता की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या