सणासुदीला मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

ती नोट निरीक्षण करून पाहीली . वाटर मार्कमध्ये महात्मा गांधी यांचे चित्र दिसून न आल्याने ती नोट बनावट असल्याचे लक्षात आले

सणासुदीला मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट
SHARES

मुंबईत कोरोना संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असे असतानाही यंदाचा गणेशोत्सव ते पोटाला चिमटा काढून साजरी करत असतानाच, मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट असून यामुळे ग्राहकांना आणि विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. वाकोला पोलिसांनी नुकतीच एका ६३ वर्षीय व्यक्तीला या बनावट नोटा बाजारात पसरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणी वाकोला पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- 'पुढच्या वर्षी लवकर या..' ५ दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाचा गणेशोत्सव जरी साधे पणात साजरी केला जात असला. तरी  दररोज लागणारी गरजेची साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. हीच संधी साधून भूरट्या चोरांनी बनावट नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र वाकोला परिसरात एका सतर्क व्यापाऱ्यामुळे त्या आरोपीचा हा प्रयत्न फसला. सांताक्रूझच्या दत्त मंदीर रोडवर मोहम्मद दिलशाह नजीर यांचे साईप्रसाद फरसाण दुकान आहे. सायंकाळी ७ वा. आरोपीने त्याच्या दुकानात येऊन २० रुपयाचे फरसाण मागितले. त्यानुसार दुकानदाराने त्याला फरसणा दिले.  त्यावेळी आरोपीने त्याच्याजवळची ५० रुपयांची नोट दुकानदाराला दिली. ती नोट निरीक्षण करून पाहीली . वाटर मार्कमधे महात्मा गांधी यांचे चित्र दिसून न आल्याने ती नोट बनावट असल्याचे लक्षात आल्यावर मित्रांच्या मदतीने पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता. त्याच्याजवळ ५० रुपयांच्या १७९ नोटा आणि १०० च्या ५ बनावट नोटा अशा ९४५० रुपये आढळून आले. या घटनेची गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांनी त्याच्यावर ४८९(ब)(क) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

हेही वाचाः- नागपाड्यात ३ मजली इमारतीचा भाग कोसळला, मदत कार्य सुरू

त्याने या नोटा कुठून आणि कशा बनवल्या याचा पोलिस तपास करत आहे. त्याच बरोबर अशा प्रकारे त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली. याची चौकशी पोलिस त्याच्याजवळ करत आहेत. गणेशोत्सव सुरू असल्याने सांताक्रूझ परिसरातील फरसाण मार्टवर नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे विक्रेतेही ग्राहकांनी दिलेली नोट केवळ रंग पाहून किंवा दुमडलेली असते तशीच घेतात. यामुळे त्यांना खरी की खोटी नोट आहे हे समजत नाही. नंतर कोणालातरी सुटे पैसे द्यायचे झाल्यास किंवा रात्री हिशेब करताना बनावट नोट आढळल्याचे लक्षात येते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा