मुंबईच्या बाजारात बनावट नोटा, पैसे स्विकारताना तपासून घ्या

१ लाखाच्या बनावट नोटा आरोपींनी कर्नाटकातून महाराष्ट्रात

मुंबईच्या बाजारात बनावट नोटा, पैसे स्विकारताना तपासून घ्या
SHARES

मुंबईच्या बाजारात सध्या नोटांची तस्करी करणाऱ्यांनी बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. त्यामुळे तुम्हची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्यवहार करताना सर्व नोटा तपासून घ्या, नुकतेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला. १ लाखाच्या बनावट नोटा आरोपींनी कर्नाटकातून महाराष्ट्रात आणल्याचे पुढे आले आहे.  

हेही वाचाः- ​Exclusive सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीएचा' धाक - पोलिस आयुक्तांचे आदेश​​​

 मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सराईत आरोपींविरोधात कंबर कसली असताना. न्यायालयातून जामीनावर सुटलेल्या आणि तारखेला हजर न राहणाऱ्या आरोपींची धरपकड आता सुरू केली आहे. त्यानुसार पोलिस भास्कर मुर्गन नाडर याच्या शोधात होते. त्याच्यावर या पूर्वी चार गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानुसार तो अॅण्टाॅप हिल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या अंग झडतीत त्याच्याजवळ १ लाख २८ हजार रुपये आढळून आले. या रक्कमेबाबत तो अस्पष्ठ माहिती देत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. 

हेही वाचाः- ​ लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा​​​

पोलिसांनी त्याला कचेरीत आणल्यानंतर नोटा तपासल्या असता. त्या नोटा बनावटअसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या नोटा त्याने स्वतः तामीळनाडून बनवल्याची कबूली दिली आहे. त्यात प्रामुख्याने २०००, ५०० आणि २०० च्या नोटांचा समावेश आहे.  भारतीय बाजारपेठेमध्ये या नोटा पसरवण्यासाठी तो घेऊन आल्याचे कबूल केले आहे. त्याच्यावर या पूर्वी वेगवेगळ्या प्रकरणात तीन गुन्हे याआधी नोंद आहेत. न्यायालयाने त्याला १३ मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या महिन्यातील बनावट नोटांची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये बनावट नोटा मोठ्या प्रमाणात येत असल्याचं समोर येत असून या नोटा महाराष्ट्रात कशाच्या माध्यमातून आणि कोणा तर्फे येत आहेत याचा तपास गुन्हे शाखा करत होते. त्याच वेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानातून दुबई आणि दुबई मार्गे भारतात आलेल्या बनावट नोटांचे एक रॅकेट उद्धवस्त केल होतं.यामध्ये २४ लाखांच्या बनावट नोटा पाकिस्तानातून भारतात आल्याचं समोर आलेलं होतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा