Advertisement

यंदा मुंबईत ‘इतक्या’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंजुरी

मुंबई महापालिकेने आतापर्यंत १,८२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा गणेशोत्सवासाठी परवानगी दिली आहे.

यंदा मुंबईत ‘इतक्या’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंजुरी
SHARES

मुंबई महापालिकेने आतापर्यंत १,८२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा गणेशोत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर संपूर्ण मुंबईतून परवानगीसाठी आलेल्या अर्जांची संख्या २,३५० एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा बराच कमी आहे. काही मोठ्या मंडळांनी कोरोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव रद्द केला असला, तरी काही मंडळं साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. (bmc allowed pandals of ganesh utsav mandal in mumbai)

सार्वजनिक गणेशोत्सवास साजरा करण्यासाठी, त्याकरीता मंडप उभारण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेने ऑनलाइन परवानगीची व्यवस्था केलेली आहे. वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या मंडपांनाच परवानगी देण्यात यावी असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे. वाहतुकीला अडथळा येत नसल्याचं प्रमाणपत्र पोलिसांनी व वाहतूक पोलिसांनी दिल्यावरच महापालिकेकडून परवानगी दिली जाते. तर न्यायालयाचे निर्देश न पाळणाऱ्या मंडळांना परवानगी नाकारली जाते.

हेही वाचा - यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!

त्यानुसार पालिकेकडे शुक्रवारी दुपारपर्यंत आलेल्या २,३५० अर्जांपैकी २५६ अर्ज नामंजूर ठरविण्यात आले. तर, २७४ अर्जांवर विविध टप्प्यांवर छाननी प्रक्रिया सुरू होती. अर्ज नाकारल्या गेलेल्या मंडळांकडून परवानगीसाठी जोडाव्या लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, दरवर्षी मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महापालिकेकडे मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी अर्ज केले जातात. असे दरवर्षी सुमारे १२ हजारांच्यावर अर्ज मुंबई महापालिकेकडे येतात. त्यामुळे माझी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विनंती आहे की, त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी अर्ज करून घ्यावी. 

खरं तर ठाकरे सरकारमध्ये बसलेले पक्ष व नेत्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या संघर्षात कशाच्या आधारे न्याय मिळाला, हे ठाऊक नाही. सातत्य आणि परंपरा याआधारे हा न्याय मिळाला आहे. म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही परवानगी घेणं अती आवश्यक आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी, अशी विनंती भाजप नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव मंडळांना काही दिवसांपूर्वी केली होती.

हेही वाचा - Ganesh Festival: गणेश मंडपासाठी यंदाही अर्ज करा, आशिष शेलारांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा