Advertisement

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

कृत्रिम तलावांवरही गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरूच होता.

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
SHARES

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ असे आर्जव करीत तमाम भाविकांनी गुरूवारी गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप दिला. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मुंबईतील चौपाटय़ा, तलावांचे काठ शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. कृत्रिम तलावांवरही गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरूच होता.

हेही वाचाः- सणासुदीला मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

गेले पाच दिवस मोठय़ा उत्साहाने भाविकांनी गणरायाची मनोभावे सेवा केली. गणरायाच्या पाठोपाठ मंगळवारी आलेल्या गौरीचेही भाविकांनी मोठय़ा आनंदात स्वागत केले. बुधवारी पूजाअर्चा केल्यानंतर या माहेरवाशीणीला गुरूवारी निरोप देण्यात आला. दुपारी ४ नंतर मुंबईतील रस्ते भाविकांची गर्दीने फुलू लागले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजार करीत भाविक गौरी-गणपतीला घेऊन विसर्जनस्थळाकडे रवाना होत होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आवाहन सकारात्मक प्रतिसाद देत अगदी साध्या पद्धतीने गौरी गणपतींचा निरोप घेतला. गौरी-गणपतीला निरोप देताना मुंबापुरी भावुक झाली होती. मुंबईत समुद्र किनारी गुरूवारी ३७१ सार्वजनिक मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले, तर घरगुती २४ हजार २२५ भाविकांनी गणपती विसर्जन केले. तसेच ३१८३ गौरींचे असे एकूण २७ हजार ७७९ गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तर पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात २४६ सार्वजनिक गणपतींचे, १२ हजार ९२५ घरगुती गणपतीचे आणि १६९१ गौरी गणपतींचे असे १४ हजार ८६२ गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.    

हेही वाचाः- 'पुढच्या वर्षी लवकर या..' ५ दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गौरी गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबईत ठिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळत होता. पोलिसांच्या जोडीला राज्य राखीव सुरक्षा दल, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दलाचे जवान आणि पालिकेचे अधिकारी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज होते. काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय सामितीचे पदाधिकारी विसर्जनस्थळी उपस्थित राहून भाविकांना मदत करीत होते. गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाटय़ांवर अशासकीय संस्था, नौदल, मुंबई बंदर विश्वस्त आणि पालिकेचे जीवरक्षक तैनात होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा