निर्विघ्नपणे पार पडला विसर्जन सोहळा !

 Pali Hill
निर्विघ्नपणे पार पडला विसर्जन सोहळा !

मुंबई - मुंबईत यंदा १०,१२३ सार्वजनिक मंडळांचे तर ५२,५९६ घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुसळधार पावसातही मुंबईकरांचा उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील विसर्जनाचा हा महासोहळा मोठ्या आनंदात पार पडला. गिरगावात ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत बँजोच्या तलावर थिरकत बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. तर उपनगरात जिथे डीजेचा बोलबाला असतो तिथे डीजेच्या तालावर तरुणाई गाण्यात तल्लीन झाली होती. यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळी 7 वाजता करण्यात आले.

Loading Comments