Advertisement

५ दिवसांच्या गौरी-गणपतींना निरोप


५ दिवसांच्या गौरी-गणपतींना निरोप
SHARES

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ५ दिवसांच्या गणपतींसह गौरींचं विसर्जन सोमवारी पार पडलं. महापालिकेच्या ६१ विसर्जन स्थळांसह ३१ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्ती आणि गौरी विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळली होती. रात्री ९ वाजेपर्यंत या सर्व विसर्जन स्थळांवर ६७२ सार्वजनिक आणि ४५ हजार ४२८ गणेशमूर्तींचं विसर्जन झालं.


किनाऱ्यांवर विशेष व्यवस्था

श्री गणरायांचं गुरुवारी आगमन झाल्यानंतर ५ दिवस मनोभावे पूजाअर्जा केल्यानंतर सोमवारी ५ दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. यंदा पाचव्या दिवशीच गौरी विसर्जनाचा योग जुळून आला. एरवी गौरी विसर्जन सहाव्या दिवशी येत असली, तरी यंदा मात्र ते पाचव्या दिवशी आल्यामुळे पाच दिवसांचे गणपती आणि गौरीसह निघणारे गणपती यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने गिरगाव, दादर, शिवाजीपार्क, जुहू आदींसह तलावांमध्ये विशेष व्यवस्था केली होती.


किती गौरी, गणपतींचं विसर्जन

रात्री ९ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व विसर्जन स्थळांवर ६७२ सार्वजनिक, ४१, २२८ घरगुती व ३५१८ गौरी अशप्रकारे ४५, ४१८ गौरी गणपतींचं विसर्जन पार पडलं. तर कृत्रिम तलावांमध्ये १०२ सार्वजनिक, ७५८५ घरगुती आणि ५२२ गौरींचं विसर्जन झालं. या विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.



हेही वाचा-

तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे

कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा