Advertisement

कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच!

यंदा महापालिकेनं ३१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून दीड दिवसांच्या सुमारे १० हजार गणेशमूर्तींचं विसर्जन या तलावांमध्ये करण्यात आलं. परंतु विसर्जित करण्यात आलेल्या या सर्व मूर्ती तलावातून बाहेर काढून त्या पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या जात आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींची घोर निराशा होत आहे.

कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच!
SHARES

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना चालना मिळावी व्हावा म्हणून महापालिकेनं भाविकांना कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करून भक्त महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. परंतु कृत्रिम तलावात विसर्जित होणारी मूर्ती पर्यावरणपूरक नसून उलट पर्यावरणाची हानी करणारी आहे. कारण ज्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जात आहेत, त्या सर्व मूर्ती बाहेर काढून पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करून फायदा काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.


समुद्राचं प्रदूषण

गणेशोत्सवात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या, कृत्रिम रासायनिक रंग असलेल्या गणेशमूर्तींचं विसर्जन समुद्रात केल्यामुळे समुद्रातील प्रदूषण, तर वाढतंच; पण सोबतच या मूर्ती दुसऱ्या दिवशी लाटांबरोबर पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याने भाविकांसाठीही हे दृष्य हेलावणारं ठरतं. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन करण्यास सुरूवात केली. त्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली.


कृत्रिम तलावांची निर्मिती

त्यानुसार यंदा महापालिकेनं ३१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून दीड दिवसांच्या सुमारे १० हजार गणेशमूर्तींचं विसर्जन या तलावांमध्ये करण्यात आलं. परंतु विसर्जित करण्यात आलेल्या या सर्व मूर्ती तलावातून बाहेर काढून त्या पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या जात आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींची घोर निराशा होत आहे.


विटा बनवण्याचा निर्धार हवेतच

माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी यांच्या संकल्पनेतून मुंबईत कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्ती बाहेर काढून त्यापासून विटा बनवण्याचा निर्धार केला होता. परंतु प्रत्यक्षात तसं होऊ शकलं नाही.


महापालिकेत गौप्यस्फोट

त्यामुळे मागील काही वर्षांपासून या कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्तींचं नेमकं काय होतं असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु यंदा या विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. मागील २ वर्षांपूर्वी मनसेचे तत्कालिन नगरसेवक संतोष धुरी यांनी कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती समुद्रात पुन्हा विसर्जित केल्या जात असल्याचा गौप्यस्फोट करत या मूर्तींचं पुन्हा समुद्रात विसर्जन न करता त्यापासून पर्यायी वस्तू बनवण्यात याव्या, अशी सूचना केली होती.


वरिष्ठांकडून सूचना

परंतु आजतागायत या सूचनांचा विचार करण्यात आलेला नाही. उलट यंदाही कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती बाहेर काढून त्यांचं विसर्जन पुन्हा समुद्रात केलं जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भावनिक मुद्दा असून यावर बोलणंही उचित ठरणार नाही. परंतु कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्तीँचं समुद्रात विसर्जन करावं, एवढ्याच सूचना आम्हाला वरिष्ठांकडून असल्यामुळे आम्ही तसं करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा-

तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे

दीड दिवसाच्या गणेश मूर्तीत यंदा ४ हजारांनी घट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा