Advertisement

दीड दिवसाच्या गणेश मूर्तीत यंदा ४ हजारांनी घट

शुक्रवारी दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचं भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं. मात्र, मागील वर्षी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाची संख्या पाहता यंदा त्यात सुमारे ४ हजारांनी घट झाली आहे.

दीड दिवसाच्या गणेश मूर्तीत यंदा ४ हजारांनी घट
SHARES

श्री गणरायांची मनोभावे पूजा केल्यानंतर शुक्रवारी दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचं भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं. मात्र, मागील वर्षी दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाची संख्या पाहता यंदा त्यात सुमारे ४ हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे अनेक भक्तांच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन झालं नाही किंवा बाप्पांचं भक्तांकडील वास्तव्य वाढल्याचं म्हटलं जात आहे.


गेल्या वर्षीची आकडेवारी 

मागील गणेशोत्सवात दीड दिवसाच्या एकूण ७१ हजार ३९२ गणेश मूर्तीचं विसर्जन झालं होतं. त्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसाच्या एकूण ६७ हजार ७७६ गणेश मूर्तीचं शुक्रवारी विसर्जन झालं. यामध्ये ४०६ सार्वजनिक गणेश मूर्ती आणि ६७ हजार ३६४ घरगुती गणेश मूर्ती व ६ गौरी यांचा समावेश आहे.


कृत्रिम तलावांची व्यवस्था

मुंबईत यंदा ३१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. यापैकी प्रभादेवी आणि वरळी येथे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तीचं विसर्जन केल्यावर ३ दिवसात त्या पाण्यात विरघळतील अश्याप्रकारे रासायनिक प्रकिया केले कृत्रिम तलाव बनवण्यात आले आहेत.


किती मूर्तींचं विसर्जन?

या सर्व तलावांमध्ये यंदा दीड दिवसाच्या १५ हजार ०५२ मूर्तीचं विसर्जन झालं. यामध्ये ९० सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश आहे. मागील वर्षी या सर्व कृत्रिम तलावात दीड दिवसाच्या १३ हजार ११३ मूर्तीचं विसर्जन झालं होतं. त्यामुळे मागील गणेशोत्सवाच्या तुलनेत यंदा सुमारे २ हजार मूर्तींच्या संख्येत वाढ झाली आहे.


दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन

  • सन २०१८ : ६७ हजार ७७६
  • सन २०१७: ७१ हजार ३९२



हेही वाचा-

का असतो बाप्पा दीड दिवसांचा? जाणून घ्या पुराणातील कथा

लाकडात साकारला साई दर्शन मित्र मंडळाचा बाप्पा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा