Advertisement

लाकडात साकारला साई दर्शन मित्र मंडळाचा बाप्पा


लाकडात साकारला साई दर्शन मित्र मंडळाचा बाप्पा
SHARES

मुंबईसह राज्यभरात विकास प्रकल्पांसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असताना 'झाडे लावा, झाडे जगवा', असा संदेश देण्यासाठी मालाडमधील श्री साई दर्शन मित्र मंडळाने यंदा लाकडात बाप्पाचं देखणं रूप साकारलं आहे.


पर्यावरणपूरक गणपती

सन १९५१ मध्ये स्थापन झालेल्या श्री साई दर्शन मित्र मंडळाला यंदा ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं 'सेव्ह ट्री'चा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यात बाप्पाच्या अवताभोवती वृक्षतोड केल्याचं डेकोरेशन करून 'सेव्ह ट्री' हा संदेश मंडळाने समाजाला दिला आहे. बाप्पाची मूर्ती इको फ्रेंडली असून लाकडाचे तुकडे, तांदूळ आणि कागद इत्यादी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून बनवण्यात आले आहेत.




आठवणींना उजाळा

श्री साई दर्शन मित्र मंडळ दरवर्षी समाजाला सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करत असते. गेल्यावर्षी या मंडळाने जुन्या नाण्यांचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारली होती. जुनी नाणी चलनात नसल्याने नाण्यांनी सजलेला बाप्पा पाहून भाविकांच्या आठवणींना उजाळा मिळाला होता.




मागील ८ वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या रुपात बाप्पाची मूर्ती साकारत आहोत. २०१२ मध्ये आम्ही चॉकलेटचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारली होती. तसंच, २०१५ मध्ये खोडरबरचा वापर करून सोशल मीडियावर आधारित मूर्ती साकारली होती.
- गिरीष लिंबाचिया, अध्यक्ष, श्री साई दर्शन मित्र मंडळ



हेही वाचा-

मुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावा

अभिनेता स्वप्निल जोशीच्या 'पंचधातू गणेशा'चं विसर्जन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा