Advertisement

अभिनेता स्वप्निल जोशीच्या 'पंचधातू गणेशा'चं विसर्जन


अभिनेता स्वप्निल जोशीच्या 'पंचधातू गणेशा'चं विसर्जन
SHARES

सगळ्यांचा लाडका गपणपती बाप्पा १६ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे देशातच नव्हे; तर जगभरात ज्यांचे हजारो 'फॅन' असतात असे कलाकारही गणपतीचे मोठे 'फॅन' आहेत. सुखकर्ता, विघ्नहर्त्या गणेशाची दरवर्षी मनोभावे पूजा करून ही मंडळी त्याला 'तू बुद्धी दे, तू तेज दे', असं साकडंच घालतात. यंदाही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी गणराय थाटात विराजमान झाले आहेत. चला तर मग दररोज एका सेलिब्रिटी बाप्पाचं दर्शन घेऊया...



दीड दिवसांचा बाप्पा

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्निल जोशी याच्या घरीही गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंचधातूच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते. या बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे कायमस्वरूपी मुक्कामाला असलेला हा बाप्पा दीड दिवसांसाठी विराजमान होतो आणि ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' या जल्लोषात घरगुती पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला जातो.



इकोफ्रेंडली सजावट

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या घरी गेल्या ६९ वर्षांपासून गणपती बाप्पा विराजमान होतात. दरवर्षी इकोफ्रेंडली, प्लास्टिक आणि थर्माकॉलचा जराही वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीने गणपतीची सजावट केली जाते. काठ पदराची साडी वापरून गणपती बाप्पाच्या मागे सजावट करण्यात येते. यंदाही याच पद्धतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती.



आमच्या घरात पंचधातूची कायमस्वरूपी गणेशमूर्ती आहे. याच गणेशमूर्तीची आम्ही दरवर्षी गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना करतो. दीड दिवस या गणेशाची आम्ही मनोभावे सेवा करतो. २१ मोदकांसह पंचपक्वान्नाचा बेतही आखतो. माझ्या आयुष्यात बाप्पाचं स्थान आई-वडिलांप्रमाणे असून ते कायम माझ्या मनात तसंच राहील.
- स्वप्निल जोशी, अभिनेता



हेही वाचा-

'अामचा दीड दिवसांचा इकोफ्रेंडली बाप्पा'- निशिगंधा वाड

...म्हणून बाप्पाला आवडतो मोदक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा