...म्हणून बाप्पाला आवडतो मोदक

पुराणानुसार, पार्वतीला देवतांनी अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक दिला. मोदक पाहून तिची दोन्ही मुलं कार्तिकेय आणि गणेश मागे लागली की तो मोदक त्यांना मिळायलाच हवा.

SHARE

यो दूर्वाकुंरैर्यजति स वैश्रमवपोणमो भवति |
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति |
स मेधावान भवति |
यो मोदकसहस्त्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति |

गणपती बाप्पाला मोदक आवडतो हे सर्वांनाच माहीत अाहे. पण बाप्पाला मोदक एवढा आवडतो तरी का? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला यासंदर्भातच माहिती देणार आहोत.


श्रेष्ठता प्राप्त करणाऱ्यास मोदक

पुराणानुसार, पार्वतीला देवतांनी अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक दिला. मोदक पाहून तिची दोन्ही मुलं कार्तिकेय आणि गणेश मागे लागली की तो मोदक त्यांना मिळायलाच हवा. त्यावेळी पार्वतीनं मोदकाचं वर्णन करून सांगितलं. पण यासोबतच एक अट पुढं ठेवली ती म्हणजे, जो कुणी आपली श्रेष्ठता प्राप्त करेल त्याला तो मोदक मिळेल.


तेव्हापासून मोदक अावडते खाद्य

हे ऐकून कार्तिकेयनं मोरावर बसून सगळ्या तीर्थस्थानांचं दर्शन घेतलं. तर गणेशनं फक्त आई-वडिलांना प्रदक्षिणा घातली. हे पाहून पार्वती म्हणाली, पूजा, तीर्थस्थानांचं दर्शन, यज्ञ, मंत्र, व्रत एकीकडे आणि आई-वडिलांची पूजा एकीकडे. सर्वात श्रेष्ठ ही आई-वडिलांची पूजा आहे. तेव्हा शंकर-पार्वतीनं असं ठरवलं की हा मोदक गणेशालाच द्यावा. त्यानंतर मोदक हे गणेशाचे आवडते खाद्य बनले.हेही वाचा -

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...

सर्वात जुन्या गणेश मंडळांना भेट दिलीत का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या