Advertisement

'अामचा दीड दिवसांचा इकोफ्रेंडली बाप्पा'- निशिगंधा वाड


'अामचा दीड दिवसांचा इकोफ्रेंडली बाप्पा'- निशिगंधा वाड
SHARES

आपला सगळ्यांचा लाडका गपणपती बाप्पा हा १६ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे देशातच नव्हे; तर जगभरात ज्यांचे हजारो 'फॅन' असतात ती कलाकार मंडळी आणि इतरही सेलिब्रिटी गणपतीचे 'फॅन' आहेत. सुखकर्ता, विघ्नहर्त्या गणेशाची दरवर्षी मनोभावे पूजा करून ही मंडळी त्याला 'तू बुद्धी दे, तू तेज दे', असं साकडंच घालतात. यंदाही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी गणराय थाटात विराजमान झाले आहेत. चला तर मग दररोज एका सेलिब्रिटी बाप्पाचं दर्शन घेऊया...



इकोफ्रेंडली बाप्पाचं आगमन

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील तसंच हिंदी सिनेसृष्टीत बरीच वर्षे कामं केलेल्या अभिनेत्री निशिगंधा वाड-देऊळकर यांच्याघरी दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात केलं जातं. निशिगंधा यांच्या घरी फक्त दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतो.

दरवर्षी अगदी पर्यावरणपूरक, इकोफ्रेंडली, प्लास्टिक आणि थर्माकॉलचा जराही वापर न करता या गणपतीची सजावट केली जाते. माहेरी आणि सासरी दीड दिवसांचा गणपती आणण्याची परंपरा असून तो पिढीजात आणला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या घरी थाटामाटात गणपती बाप्पाचं विराजमान होतं. माझ्यासाठी आईप्रमाणे गणपती बाप्पालाही मी जवळचं मानते. नेहमी कामात असणारे सर्वजण गणपती बाप्पाच्या दर्शन घ्यायच्या निमित्तानं का होईना एकत्र येतात, भेटतात, मजा मस्ती करतो. विशेष म्हणजं आमच्या नंतरची पिढी यात उत्साहानं सहभागी होते यांच मला कौतुक आहे.
- निशिगंधा वाड, अभिनेत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा