Advertisement

मुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावा

शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेने मुंबई शहरात एकही मंडप नसल्याचा दावा केला. मुंबई शहरात १३२ व उपनगरात २१७ बेकायदा मंडप असल्याची राज्य सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचं ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगितलं.

मुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावा
SHARES

शहरातील बहुेतक सर्वच मुख्य रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असताना मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नसल्याचा दावा मुंबई महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. महत्त्वाची बाब म्हणजे बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरात ३०० हून अधिक बेकायदा मंडप असल्याची माहिती उच्च न्यायालयाला सादर केली होती. सरकारच्या या माहितीवर महापालिकेने आक्षेप घेतला.


अनेक याचिका दाखल

गणेशोत्सवासह इतर सण आणि उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप उभारले जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे बेकायदा मंडपांवर कारवाई करण्याचे महापालिकांना आदेश द्यावे, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली.


न्यायालयाचे निर्देश

या आधीच्या सुनावणीत न्यायालयाने सण, उत्सवांदरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असे निर्देश राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला दिले होते. रस्त्यावर बेकायदा मंडप उभारल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.


चुकीची आकडेवारी

त्यानंतर शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेने मुंबई शहरात एकही मंडप नसल्याचा दावा केला. मुंबई शहरात १३२ व उपनगरात २१७ बेकायदा मंडप असल्याची राज्य सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचं ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगितलं.


कारवाई सुरूच

मुंबई शहरात एकही बेकायदा मंडप नसून उपनगरातील ७९ बेकायदा मंडपांपैकी २० मंडपांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर उपनगरातील बेकायदा मंडपांपैकी ४४ मंडप खासगी जमिनी तसंच झोपडपट्ट्यांमध्ये असून ५ मंडप हे सरकारी जमिनीवर असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

त्यावर न्यायालयाने या आकडेवारीत इतकी तफावत का आहे? असा प्रश्न विचारत राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.हेही वाचा-

'आवाज नको डीजे...', न्यायालयाची बंदी कायम

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोपRead this story in English
संबंधित विषय
Advertisement