तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे

राज ठाकरे यांनी डीजे मालकांना, गणेशोत्सव मंडळांना आपला पाठिंबा देतानाच सावध भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतिक्षा करा, मात्र मंडळ तयार असतील तर डीजे वाजवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

  • तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरे
SHARE

विसर्जनादरम्यान डीजे वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातल्याने धास्तवलेल्या डीजे मालकांनी सोमवारी थेट दादर येथील कृष्णकुंजची वाट धरली. डीजे मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी राज ठाकरे यांनी डीजे मालकांना, गणेशोत्सव मंडळांना आपला पाठिंबा देतानाच सावध भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतिक्षा करा, मात्र मंडळ तयार असतील तर डीजे वाजवा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.


न्यायालयाने नाकारली परवानगी

गणपती विसर्जनादरम्यान डीजे वा इतर वाद्यांमुळे ध्वनिप्रदूषण होतं असं म्हणत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं विसर्जनादरम्यान डीजे वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. सणासुदीतील गोंगाटाकडे डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, असं म्हणत न्यायालयानं डीजेवर बंदी घातली आहे. या बंदीमुळं धास्तवलेल्या मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यातील डीजे मालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
तोडगा काढण्याची विनंती

या भेटीदरम्यान डीजेवर बंदी आल्यानं आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून यावर काही तोडगा काढण्याची विनंती यावेळी डीजे मालकांनी केली. त्यानुसार राज ठाकरे यांनी १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचवेळी जर गणेशोत्सव मंडळ डीजे वाजवण्यास तयार असतील तर खुशाल डीजे वाजवा असा सल्लाही त्यांनी डीजे मालकांना दिला आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यानं राज ठाकरे यांनी हा सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळं आता डीजे मालक नेमकी काय भूमिका घेतात, विसर्जनादरम्यान डीजे वाजतो की नाही? हाच प्रश्न आहे.हेही वाचा-

'आवाज नको डीजे...', न्यायालयाची बंदी कायम

मुंबई शहरात एकही मंडप बेकायदा नाही, महापालिकेचा दावासंबंधित विषय