Advertisement

चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ४ जण जखमी

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चेंबूरमध्ये घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ४ जण जखमी
File Photo
SHARES

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत घराचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


ठक्कर बाप्पा कॉलनीमध्ये हनुमान गल्लीतील हनुमान चाळ येथील घराचा भाग गुरूवारी सायंकाळी कोसळला. या घरात पोटमाळ्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. येथील मलबा काढण्याचं काम सुरू आहे. तसंच, बचाव कार्य सुरू असून जखमींना राजावडी रुग्णालयात दाखल केलं आहे. तर गंभीर रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा