लाॅकडाऊनमध्ये सिगारेटची तलप तरुणांना पडली महागात

लाॅकडाऊनमध्ये अगदी सुपारीपासून अंमली पदार्थ मिळणे मुश्किल झाले होते. एक तरी सिगारेट मिळावी यासाठी व्यसनी लोक कित्येक किलोमीटरचा प्रवास करत होती. शंभर रुपयांचे सिगारेट दुप्पट किंमतीला विकून दुकानदार आपले खिसे भरत होते. याच दुकानदारांना टोप्या लावून  आपली सिगारेटची तलप भागवणाऱ्या पाच महाविद्यालयीन तरुणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांनी ज्या प्रकारे दुकानदाराची फसवणूक केली आहे. ते ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल...

  हेही वाचाः- मुंबईत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा

ओशिवरा परिसरात राहणारे पाचही आरोपी हे १८ ते २२ च्या वयोगटातले असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मार्चमध्ये सर्वत्र लाँकडाऊन सरकारने पुकारले. त्यात तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्याने काळ्याबाजारात आपसूकच गुटखा, सिगारेट, तंबाखूची मागणी वाढली. संधीचा फायदा घेऊन दुकानदारही दुप्पट किंमतीने या गोष्टी विकू लागले.  दरम्यान या प्रकरणातील आरोपी जिमित पाचांळ (२०), अपूर्व गोहिल (२२), भाविक पडियार (२२), सागर गाला (२४), निसर्ग मस्करीया (१९) हे ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दुकानदाराकडून नियमित सिगारेट घ्यायचे, मात्र लाॅकडाऊनमुळे दुकानदार सिगारेटची पाकिटे महाग विकत होता. तेवढे पैसे यांना देणं परवडतन नव्हतं, जून महिन्यात ऐकी दिवशी खिसा मोकळ होता. मात्र काही केल्या सिगारेटची तलप जाईना म्हणून या पाच जणांनी दुकानदाराकडून सिगारेटची पाकिटंतर घेतली. मात्र दुकानदाराला पेटीएममवर पैसे पाटवतो असे सांगून वेगवेगळ्या मोफ़त वेबसाईटवरुन बनावट मेसेज तयार करून, विक्रेत्यांच्या मोबाईलवर रक्कम  पाठविल्याचा मेसेज पाठवायचे. कामाच्या गडबडीत दुकानदारही पैसे आल्याचा मेसेज पासून खरचं पैसे आले की नाही याची खात्री करत नव्हता.

 हेही वाचाः-  'चाळसंस्कृती'मधील गणेशोत्सव!

एकदा चोरीचा डाव पचला म्हणून या पाचही तरुणांनी मग दुकानदाराकडून सिगारेटची पाकिटं घेत, त्याला टोपी घालायला सुरूवात केली. दरम्यान आॅगस्ट महिन्यात ज्या वेळी दुकानार बँकेत पासबुकची इंट्री केली. त्यावेळी त्या मुलांनी पाठवलेल्या पैशांची नोंद दिसून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरोधात भा.द.वी कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दयानंद बांगर, पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत व पोलीस हवालदार दयानंद साटम, लक्ष्मण बागवे,  पोलीस नाईक विनोद माने, पोलीस शिपाई किरण बारसिंग , उमेश सोयंके , कमरुलहक शेख , मनीष सकपाळ आणि संग्राम जाधव  यांच्या पथकाने उत्कृष्ठ तपास करून या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या