Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा


मुंबईत येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मुंबईत शुक्रवारपासून पावसाची संततधारा सुरू असून, रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं. तसंच जोराच्या वाऱ्यांमुळ अनेक ठिकाणी नुकसान ही झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार असल्यानं अनेका चाकरमान्यांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत नाही आहे. परंतु, अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. मुंबईला ७ तलावांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, यामधील बहुतांश तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळं शनिवारपासून महापालिकेनं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा