येत्या ४८ तासात मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सकाळी काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काहीवेळेसाठी विश्रांती घेतली आहे. मात्र येत्या २४ ते ४८ तासात मुंबई सह किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम तर काही ठराविक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. 

मुंबईत दोन दिवसात पावसाची संतत रिपरिप सुरू असली. तरी पुढचे २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता मुंबईच्या वेध शाळेने वर्तवली आहे. याबाबत मुंबई हवामान वेधशाळेचे उप संचालक के.एस.होसळीकर यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास शहरात ठिक ठिकाणी पाणी तुंबायला सुरूवात होते. त्यामुळे  हवामान खात्याकडून पालिकेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई आणि किनारपट्टी सोबतच उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या महाराष्ट्राच्या भागांमध्येही जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबई सोबतच कोकणात, मराठावाड्यात पावसाचा जोर वाढल्याने आता सामान्यांसह शेतीची कामं करणार्‍यांसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचाः-महाराष्ट्रात लॉकडाऊन  ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद

मुंबई मध्ये सातत्याने जोरदार पाऊस पडत राहिल्याने सखल भागामध्ये पाणी तुंबायला सुरूवात होते. तर लॉकडाऊनमध्येही ज्यांना घराबाहेर पडणं, कामावर जाणं आवश्यक आहे त्यांना ट्राफिक जामचा थोडा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान 1 ऑगस्टपासून पुन्हा कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच मुंबई हवामान वेधशाळेने दिला आहे.

हेही वाचाः-मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या