Advertisement

मुंबईत मागील २२ तासांत अतिमुसळधार पाऊस


मुंबईत मागील २२ तासांत अतिमुसळधार पाऊस
SHARES

मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर, अद्यापही पावसाचा जोर कायमच आहे. बुधवार सकाळी ८ वाजून ३० मिनीटांपासून ते आज सकाळपर्यंत बांद्रा – २०१ मिमी, कुलाबा – १५२ मिमी, सांताक्रुझ – १५९.४ मिमी, महालक्ष्मी – १२९ मिमी, राम मंदिर – १३० मिमी पावासाची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबईतील विविध भागांमध्ये पुढील ६ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गुरुवारी किनारपट्टीवर मुसळधार तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, या भागांसाठी तयारीत राहण्याचा इशारा (ऑरेंज अर्लट) देखील देण्यात आला आहे. तर, गुरुवारनंतर पावसाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.

पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याच्या घटनांचे पूर्वानुमान देणाऱ्या ‘आयफ्लोज मुंबई’ नव्या प्रणालीनुसार भायखळा, आग्रीपाडा, दक्षिण मुंबई, देवनार, अंधेरी (प.), विलेपार्ले (प.) या प्रभागातील सखल भागात काही ठिकाणी दोन फूट पाणी साचू शकते. तर चेंबूर, वरळी, लोअर परळ, भांडूप (प.) आणि दहिसर प्रभागातील काही ठिकाणी एक फूट पाणी साचण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा