भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीचा अपघात

मुंबईतील  भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसार लाड यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी मुंबई-पुणे-मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला. कामशेत बोगद्यानंतर टोल नाक्यजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाल्याचे कळते. सुदैवाने या अपघातात आमदार प्रसाद लाड यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र त्याच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड हे पक्षाच्या कार्यक्रमांसाठी अहमदनगर येथे जात असताना. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याच कळते. या अपघातात लाड यांच्या गाडीच्या डाव्या बाजूचे पूर्णतह नुकसान झाले आहे.

याबाबत लाड यांनी ट्विटरद्वारे व्हिडिओ शेअर  केला आहे. या व्हिडिओत “अपघात झाल्याची बातमी खरी असली तरी गणपती बाप्पाच्या कृपेने मी, माझ्यासोबतचे पोलीस अधिकारी, माझे स्वीय सहाय्यक, गाडी ड्रायव्हर आम्ही सगळे सुखरुप आहोत. काहीही झालेलं नाही. गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे एवढा मोठा अपघात होऊनही आम्हाला साधं खरचटलंही नाही”, “माझी काळजी करणाऱ्या आणि काळजीपोटी फोन करणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी सुखरुप आहे. मी माझा अहमदनगरचा दौरा करण्यासाठी पुढे जात आहे. तरी आपण केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.

हेही वाचाः- स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील ५८ पोलिसांना केंद्राकडून पदके जाहीर

हेही वाचाः- जुहूतील ‘ते’ प्रकरण पोलिसांच्या आलं अंगलट, चार पोलिस निलंबीत

पुढील बातमी
इतर बातम्या