Advertisement

सुप्रिया ताई, तुम्हाला 'हे' शोभत नाही - प्रसाद लाड

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करणारं एक ट्विट नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या ट्विटनंतर सुळे आणि लाड यांच्यात शाब्दिक सामना रंगला असून लाड यांनी सुळेंच्या ट्टविटला उत्तर दिलं आहे.

सुप्रिया ताई, तुम्हाला 'हे' शोभत नाही - प्रसाद लाड
SHARES

भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करणारं एक ट्विट नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या ट्विटनंतर सुळे आणि लाड यांच्यात शाब्दिक सामना रंगला असून लाड यांनी सुळेंच्या ट्टविटला उत्तर दिलं आहे.



'शहानिशा न करता आरोप'

"उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून दोनदा गौरवण्यात आलेल्या, मोठ्या घराण्यातल्या व्यक्तिला एखादं ट्विट करताना त्याची शहानिशा न करणं आणि एखाद्याला जाणूनबजून टार्गेट करणं हे शोभणारं नाही. ही टीका केवळ राजकीय द्वेषातून करण्यात आली असून राष्ट्रवादीनं माझा धसका घेतला आहे", अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.


काय आहे प्रकरण?

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस)कडून लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीवर मानवी तस्करीचा आरोप लावण्यात आला नि त्यानंतर लाड आणि त्यांची कंपनी एका मोठ्या वादात अडकली. एप्रिलच्या सुरूवातीचं हे प्रकरण असून या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी एक ट्विट करत लाड यांच्यावर टीका केली आहे.


 


ताई म्हणे 'हाच तुमचा पारदर्शक कारभार?'

"लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपामध्ये पावन झाला काय?" असा सवाल सुळे यांनी या ट्विटमध्ये केला आहे. शिवाय "हे सर्व तुमच्या डोळ्यांदेखत होत असून हाच तुमचा पारदर्शक कारभार आहे का?" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुळे यांनी निशाणा साधला आहे.


'धसका घेतल्यामुळेच वैयक्तिक आरोप'

सुळे यांच्या या ट्विटला उत्तर देताना "आपण सुप्रिया ताईंच्या ट्टविटनं दुखावल्याचं म्हणत त्यांच्याकडून अशा वैयक्तिक टीकेची अपेक्षा नव्हती", असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. तर "हे सर्व राजकीय द्वेषातून होत असून भाजपामध्ये आपण कमी काळात जी कामं केली आहेत त्याचाच धसका राष्ट्रवादीनं घेतला आहे आणि त्यामुळेच आपल्यावर असे वैयक्तिक आरोप होत आहेत" असंही त्यांनी म्हटलं आहे.




'आता माझा राजकीय भाव वाढला'

दरम्यान, 'बीसीएएसनं आपल्या कंपनीला नोटीस पाठवली होती. त्यानुसार चौकशी झाली असून कंपनीला आणि आपल्याला बीसीएएसकडून क्लीनचिट मिळाली आहे. असं असताना प्रकरणाची शहानिशा न करता अशा प्रकारचं ट्विट टाकणं हे ताईंना शोभणारं नसल्याचं' म्हणत लाड यांनीही सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. तर 'पवार साहेब नेहमी सांगायचे की आरोप झाले की तो माणूस मोठा होतो. त्यामुळे ताईंच्या या ट्विटवरून माझा राजकीय भाव वाढला' असल्याची कोपरखळीही प्रसाद लाड यांनी मारली आहे.



हेही वाचा

राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण? जयंत पाटील की शशिकांत शिंदे?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा