राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण? जयंत पाटील की शशिकांत शिंदे?

तटकरे यांच्यानंतर सांगलीतील जयंत पाटील आणि सातऱ्यातील शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. २९ एप्रिलला पुण्यात राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यामुळे पाटील की शिंदे वा दुसरंच कोणी बाजी मारतं हे २९ एप्रिलला समजेल.

SHARE

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळं करा', प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक नसून नव्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करा', अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांना देताच अवघ्या काही मिनिटांतच चक्रं फिरली आणि तटकरेंची वर्णी थेट राष्ट्रीय महासचिवपदी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


कुणाचं नाव शर्यतीत?

तटकरे यांच्यानंतर सांगलीतील जयंत पाटील आणि सातऱ्यातील शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. २९ एप्रिलला पुण्यात राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यामुळे पाटील की शिंदे वा दुसरंच कोणी बाजी मारतं हे २९ एप्रिलला समजेल.


२९ एप्रिलला निवड

२९ एप्रिलला राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. मात्र तटकरे यांनी नव्यानं प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त होण्यास नकार दिल्यानं आणि त्यानंतर त्यांची राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती झाल्यानं आता नव्या प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


कोण, कुणाचं खास?

तटकरेंनंतर चर्चेत असलेल्या नावांपैकी एक नाव असलेले जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर दुसरं नाव शशिकांत शिंदे यांचं असून ते अजित पवारचे खास मानले जातात. त्यामुळे आता शरद पवारांचे निकटवर्तीय की अजित पवारांचे निकटवर्तीय नवे प्रदेशाध्यक्ष होणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा-

चौकशीला आम्ही सामोरे जातोय - तटकरे

सत्ताधारी अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत - तटकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या