Advertisement

चौकशीला आम्ही सामोरे जातोय - तटकरे


चौकशीला आम्ही सामोरे जातोय - तटकरे
SHARES

सिंचन घोटाळ्यातील आरोपाबाबत डिसेंबर २०१४ पासूनच राज्य सरकारने आमची चौकशी सुरू केली असून, आम्ही त्या चौकशीला सामोरे जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगत जास्त भाष्य करणे टाळले.

रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरण गैरव्यवहार प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ठाणे न्यायालयात ३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.


आमचा एकही आमदार फुटणार नाही -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. यावर तटकरे यांना विचारले असता त्यांनी आम्हाला आमच्या
आमदारांवर विश्वास आहे. एकही आमदार आमचा फुटणार नाही, असे सांगत या फक्त अफवा असल्याचे सांगितले.

मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महाग -
देशात पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. मात्र सर्वाधिक आर्थिक उलाढाल ज्या मुंबईतून होते, त्या मुंबईत सगळ्यात महाग पेट्रोल असल्याचे सांगत पेट्रोल दरवाढीच्या निमिताने लोकांना अच्छे दिन अनुभवायला मिळत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा