Advertisement

तटकरेंच्या अडचणीत वाढ? सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल


तटकरेंच्या अडचणीत वाढ? सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
SHARES

रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरण गैरव्यवहार प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ठाणे न्यायालयात तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु, लाचलुचपत विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आरोपींमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. 


आरोपी कोण ?

कोंढाणे प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने एफ. ए. कन्स्ट्रक्शनचे निसार खत्री, कोकण पाटबंधारे विकास विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बी. बी. पाटील, तत्कालीन मुख्य अभियंता पी. बी. सोनावणे, तत्कालीन अधीक्षक आर. डी शिंदे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. पी. काळुखे, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश रिठे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.


काय आहे घोटाळा ?

कर्जतजवळ कोंढाणा धरण बांधण्यात आले आहे. सुनील तटकरे जलसंपदा मंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या धरणाची उंची बेकायदेशीररित्या वाढवल्याने राज्य सरकारला जवळपास ९० कोटींचे नुकसान झाले. विशेष म्हणजे कंत्राटदार एफ. ए. कन्स्ट्रक्शन पात्र नसूनही त्यांना कंत्राट देण्यात आले.

फडणवीस सरकारने दोन वर्षांपूर्वीच ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चौकशी केली होती. 

आता पुन्हा या प्रकरणाला गती येण्याची शक्यता आहे. दरम्यान या वृत्ताबाबत 'मुंबई लाइव्ह'ने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी या विषयी बोलण्यास नकार दिला.



हेही वाचा - 

सत्तेबाहेरचा काळ माणसं ओळखायला शिकवणारा - सुनील तटकरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा