Advertisement

सत्ताधारी अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत - तटकरे


सत्ताधारी अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत - तटकरे
SHARES

राज्यात 2014 साली सत्तापरिवर्तन झाले. मात्र राज्याचे प्रमुख असलेल्यांची भाषणे पाहिली तर ते अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.


आगामी निवडणुकांकडे लक्ष

राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांची दुबार पेरणी वाया गेली आहे. पण सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष न देता आगामी निवडणुकांत कोण किती जागा जिंकेल, या आकडेवारीत गुंतले आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी शेतकऱ्यांची चिंता करावी, असा सल्ला तटकरे यांनी दिला आहे.

सत्ताधारी पक्षाने सध्या राजकारणाचा खेळखंडोबा केला असून किमान दहा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? ते सरकाने जाहीर करावे, असे आव्हानच तटकरे यांनी दिले आहे. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाईंची चौकशी कोण करत आहे, ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. तावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली. निकालाचा घोळ करुन सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.

कुलगुरुंना केवळ रजेवर पाठवून चालणार नाही तर त्यांची हाकालपट्टीच केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार आहे? अधिवेशन संपून आठवडा झाला, तरी याबाबत स्पष्टता नाही, मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी तटकरे यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते.



हे देखील वाचा -

लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार - मुख्यमंत्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा