COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

जुहूतील ‘ते’ प्रकरण पोलिसांच्या आलं अंगलट, चार पोलिस निलंबीत

भावाची हत्या करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजूचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केली होती.

जुहूतील ‘ते’ प्रकरण पोलिसांच्या आलं अंगलट, चार पोलिस निलंबीत
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मार्च महिन्यात देशात सर्वञ संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तरी ही अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत. याच मारहाणीत आता एका तरुणाचा मृत्यू झाल्याने तरुणाला केलेली मारहाण आता पोलिसांच्या अंगलट आली.  राजू देवेंद्र असे या मृत तरुणाचे नाव असून पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केला होता. या प्रकऱणात आता जुहू पोलिस ठाण्यातील पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः- मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार? वडेट्टीवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. मार्च ३ रोजी राञी १ वा. राजू हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना. पोलिसांनी त्याला पकडून जुहू पोलिस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. माञ तसे न करता पोलिसांनी सकाळी ६ वा. रस्त्यातच अमानुष मारहाण केली. या मारहाणीत राजू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले, माञ त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहिर केले. राजू हा पोलिसांच्या अमानुष मारहाणीचाच बळी पडाला असल्याचा आरोप त्याचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केला होता.

हेही वाचाः- परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये सूट

माञ पोलिसांनी मनिकम वेलू देवेंद्रचे आरोप चुकीचे असून राजू हा राञीच्या वेळेस दरोडा टाकण्यासाठी फिरत होता. त्याच्यावर  या पूर्वी ही गुन्ह्यांची नोंद आहे. मनिकम वेलू देवेंद्रने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. माञ राजूला रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडिओ त्याच्या घरातल्यांनी काढला आहे. त्यात अंगावर वळ उठे पर्यंत मारहाण केल्याचे वर्ण खूप काही बोलत आहेत. भावाची हत्या करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजूचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केली होती. त्या नुसार या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत पोलिस नाईक संतोष  गणपतराव देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे हे चार पोलिस शिपाई हे दोषी आढळले. त्यानुसार जुहू पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात कलम ३०२, १४१,१४२,१४३, १४४,१४७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा