जुहूत पोलिसांच्या अमानुष मारहाणीतच तरुणाचा मृत्यू ?, भावाचा आरोप


जुहूत पोलिसांच्या अमानुष मारहाणीतच तरुणाचा मृत्यू ?, भावाचा आरोप
SHARES


देशात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सध्या सर्वञ संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तरी ही अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत. याच मारहाणीत आता एका तरुणाचा मृत्यू झाल्याने  तरुणाला केलेली मारहाण आता पोलिसांच्या अंगलट आली आहे. राजू देवेंद्र असे या मृत तरुणाचे नाव असून पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचा भाऊ शंकरने केला आहे.

विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. सोमवारी राञी 1 वा. राजू हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना. पोलिसांनी त्याला पकडून जुहू पोलिस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. माञ तसे न करता पोलिसांनी सकाळी 6 वा. रस्त्यातच अमानुष मारहाण केली. या मारहाणीत राजू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले, माञ त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी जाहिर केले. राजू हा पोलिसांच्या अमानुष मारहाणीचाच बळी पडाला असल्याचा आरोप शंकरने केला आहे.


माञ पोलिसांनी शंकरचे आरोप चुकीचे असून राजू हा राञीच्या वेळेस दरोडा टाकण्यासाठी फिरत होता. त्याच्यावर या पूर्वी ही गुन्ह्यांची नोंद आहे. शंकरने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. माञ राजूला रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडिओ त्याच्या घरातल्यांनी काढला आहे. त्यात अंगावर वळ उठे पर्यंत मारहाण केल्याचे वर्ण खूप काही बोलत आहेत. भावाची हत्या करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजूचा भाऊ शंकरने केली आहे.
संबंधित विषय