Advertisement

मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार? वडेट्टीवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादीत प्रमाणात चालवण्यात येणारी मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार? असा प्रश्न सरकारला सातत्याने विचारला जात आहे.

मुंबईची लोकल ट्रेन कधी सुरू होणार? वडेट्टीवारांनी दिलं ‘हे’ उत्तर
SHARES

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादीत प्रमाणात चालवण्यात येणारी मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार? असा प्रश्न सरकारला सातत्याने विचारला जात आहे. त्यावर भाष्य करताना मुंबईतील उपनगरीय लोकलसेवेबाबत सरकारमधील प्रमुख मंत्री तसंच मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे. दोन दिवसांत याबाबत पुन्हा बैठक होणार असून त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (maharashtra cabinet minister vijay wadettiwar clarifies on mumbai local train)

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत लोकल वाहतूक, मेल आणि एक्स्प्रेस सेवा बंद राहणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. रेल्वे प्रशासनाने असं कुठल्याही प्रकारचं पत्रक काढलेलं नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला.

हेही वाचा - ३० सप्टेंबरपर्यंत लोकल, मेल-एक्स्प्रेस सेवा बंद? रेल्वेने केला खुलासा

शिवाय १२ ऑगस्टनंतरही मुंबईची लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहील, असं निवेदन रेल्वेनं जाहीर केलं. म्हणजेच, आगामी काळात केवळ अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोकांनाच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात नियमित स्वरूपात चालवण्यात येणाऱ्या लोकल, मेल आणि एक्स्प्रेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ परप्रांतीय मजुरांसाठी मध्यंतरीच्या काळात मोठ्या संख्येने श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या तर, मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादीत स्वरूपात लोकल ट्रेन चालवण्यात येत आहेत. त्याव्यतीरिक्त इतर सर्व सेवा बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन धोरणाअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगधंदे सुरू केले असले, तरी या उद्योगधंद्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक वाहतुकीचं साधन प्रवाशांना उपलब्ध नाही. एसटी, बेस्टमधील गर्दी, मर्यादीत संख्या, लागणारा उशीर यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला खासगी वाहनांनी प्रवास करणारे नोकरदारही वाहतूककोंडीत अडकत आहेत. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी लोकल ट्रेन सुरू करण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी होतआहे.

हेही वाचा -  १२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा