पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? जमावाने केली वाहनांची तोडफोड


पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? जमावाने केली वाहनांची तोडफोड
SHARES

धारावीत एकाच दिवशी झालेल्या ८ घरफोड्यांप्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. या तरुणाचा रविवारी सायन रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत, पोलिस गाड्यांची तोडफोड केली. जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिसांचे ५ जवान जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात सायन रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यासाठी या तरूणाला गंभीर मारहाण केली, या मारहाणीतूनच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू लेप्टोस्पायरोसिसने झाल्याचं पोलीस सहअायुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी स्पष्ट केलं अाहे. 



काय आहे प्रकरण?

धारावी पोलिस ठाणे परिसरात मागील अनेक दिवसांपासून घरफोडींच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शनिवारी एकाच दिवसात धारावीत ८ ठिकाणी घरफोड्या झाल्या. या पार्श्वभूमीवर आरोपींचा शोध घेताना पोलिसांनी संशयित म्हणून धारावीच्या गांधी नगरमधील सचिन जैस्वार या तरूणाला ताब्यात घेतलं.


थर्ड डिग्रीमुळे मृत्यू?

सचिनने गुन्ह्यांची कबुली द्यावी, यासाठी पोलिसांनी 'थर्ड डिग्री'चा वापर केला. या मारहाणीत सचिनची प्रकृती खालावल्यानं त्याला शनिवारी रात्री उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला. त्यावेळी सचिनचे नातेवाईक आणि मित्रपरिवारानं सायन रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राग अनावर झालेल्या १०० हून अधिक लोकांच्या जमावानं पोलिसांवर दगडफेक करत पोलिसांच्या ३ गाड्यांची मोडतोड केली.



५ पोलिस जखमी

एवढ्यावरच न थांबता रस्तावरील पेव्हरब्लाॅक उखडून पोलिसांवर जीवघेणा हल्लाही केला. या दगडफेकीत २ पोलिस काॅन्स्टेबल आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ३ असे एकूण ५ जण गंभीर जखमी झाले. यात एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी वेळीच सुरक्षा दलाची वाढीव कुमक आणून जमाव पांगवला. या प्रकरणी सायन पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.



पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या वडिल रवींद्र जैस्वार यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून जखमी पोलिसांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा-

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या गाडीला अपघात

सोनं लुटणाऱ्या टोळीला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा