मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांची धावाधाव

 Santacruz
मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांची धावाधाव
Santacruz, Mumbai  -  

मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या मुंबई विद्यापीठात झेरॉक्स सेंटर अभावी दररोज हजारो विद्यार्थ्यांची धावाधाव होते. सांताक्रुझ पूर्वमधल्या कालिना परिसरातील मुंबई विद्यापीठात वेगवेगळ्या शहरातून विद्यार्थी शिकायला येत असतात. महात्मा जोतीबा फुले भवनातील परीक्षा विभागात केवळ एकच झेरॉक्स सेंटर आहे. या सेंटरवर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठाच्या बाहेर जावे लागते. हे अंतर तब्बल दोन किलोमीटर असल्यानं विद्यार्थी रिक्षानेच बाहेर जातात. म्हणजेच एखाद्या रुपयाच्या झेरॉक्ससाठी तब्बल शंभरपट जास्त पैसे मोजावे लागतात. 

Loading Comments