मालवणीत 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

  MHADA Ground
  मालवणीत 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
  • जयाज्योती पेडणेकर
  • शहरबात
  मुंबई  -  

  मालवणी- मालवणी गेट नंबर सहा परिसरात आत्महत्येची घटना समोर आली आहे. कलेक्टर कंपाऊंडच्या प्लॉट नंबर 24 मध्ये राहणाऱ्या 35 वर्षीयजहांगीर आलम नादाफ मंसूरी या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी असून मुंबईत एकटा राहत होता. त्याचा भाऊ जेव्हा बिहारमधून भेटायला आला, तेव्हा त्याच्या  मुंबईतल्या राहत्या घरी जहांगीरचा मृतदेह आढळला. जहांगीर मुंबईत टेलरचे काम करत होता. दीड वर्षापूर्वी त्याला परदेशात नोकरीसाठी जायचे होते. त्यासाठी त्याने सासूकडून 70 हजार रुपये उधार घेतले. मात्र वैद्यकीय चाचणीत अपयश आल्यामुळे त्याचा व्हिसा नाकारला गेला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.