Advertisement

नोकरीचं आमिष दाखवून मुलांची फसवणूक


नोकरीचं आमिष दाखवून मुलांची फसवणूक
SHARES

नोकरीचं आमिष दाखवून 900 तरूणांची फसवणूक करणा-या कंपनीविरोधात आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. पीसी टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. नोकरीचं आमिष दाखवून प्रत्येक मुलाकडून 25 हजार रुपये घेण्यात आले. अनेक तरूणांना प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण भत्ता म्हणून दर महिना 7 हजार रूपये देण्यासंदर्भात लेखी करारही झाला. मात्र तरूणांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. अशाप्रकारे या बेरोजगार तरुणांना 11 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरूणांनी ठाण्यातल्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गंडा घालणा-या पंकज सिंग, छाया सिंग यांना अटक करण्याची मागणी केली. पण पोलिसांकडून पुढील कारवाई होत नसल्यानं या तरूणांनी आंदोलन केलं.

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा