दानाबंदर परिसरात आरोग्य शिबीर

 Churchgate
दानाबंदर परिसरात आरोग्य शिबीर
Churchgate, Mumbai  -  

कुलाबामधल्या वॉर्ड क्रमांक 233 इथल्या दानाबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण आढळून आलेत. मुंबई महानगरपालिका आणि ह्युमन अपलिफ्टमेंट मिशन (हम) यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महपालिकेचे डॉ.एम.जी. मुळेकर त्यांच्या पथकानं आरोग्य शिबिरात तपासणी केली. यावेळी तापाच्या रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आला. याशिवाय अनेक रुग्णांची मधुमेह चाचणीही करण्यात आली. या वॉर्डचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी रहिवाशांना ताप अंगावर न काढता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.

Loading Comments