लाचखोर मुकादम अटकेत

 Bhandup
 लाचखोर मुकादम अटकेत
Bhandup, Mumbai  -  

भांडुप - मुंबई महानगरपालिकेच्या दोन लाचखोर मुकादमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी बेड्या ठोकल्या. कन्हैयालाल राठोड (४९) आणि संदीप मोरे (३४) अशी या लाचखोरांची नावे असून ते पालिकेच्या भांडुप एस वॉर्ड कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापनात काम करत होते.

पालिकेत काम करणारे कर्मचारी कामावर आल्यानंतर दोन्ही मुकादम फिग्जिअन पायलट इरेजर पेनने कर्मचाऱ्याच्या हजेरी पटलावर सह्या घ्यायचे. त्यानंतर लायटरच्या ज्वालांच्या सहाय्याने या सह्या मिटवून तो कर्मचारी गैरहजर दाखवायचे. नंतर या कर्मचाऱ्याची हजेरी लावण्यासाठी दोघेही लाचेची मागणी करत होते. अशा प्रकारे दोघांनीही एका कर्मचाऱ्याकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून एसीबीने कारवाई करत १ हजार रुपयांची लाच घेताना दोन्ही लाचखोर मुकादम राठोड आणि मोरे यांना कांजुरमार्ग येखील कार्यालयातून अटक केली.

Loading Comments