Advertisement

बाप्पांच्या स्वागतासाठी सजली मुंबई


बाप्पांच्या  स्वागतासाठी  सजली मुंबई
SHARES

गणरायाचे आगमन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरूये. गणरायाच्या चाहुलीनं बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घाटकोपरमधल्या मीनल शॉपिंग सेंटर, गोद गल्ली, स्टेशन आणि मेट्रो स्टेशन परिसर गजबजलेला दिसून येतोय. विषेश म्हणजे हिराचंद देसाई मार्गावर विविध मखर पाहायला मिळतात. जय मल्हार, शिवमंदिर, राजमहल आणि कैलास पर्वत हे मखर गणेशभक्तांना जास्त आकर्षित करतायेत. दीड फूटांपासून ते पाच फूटांपर्यंत थर्माकॉलचे मखर बाजारात उपलब्ध आहेत. चारशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत हे मखर बाजारात उपलब्ध आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा