Advertisement

बाप्पांनीही घेतला हाती मोबाईल


SHARES

दहिसर पूर्व एस.वी.रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अति प्रमाणात मोबाईल वापरत असलेल्या तरुणांसाठी एक चांगली चित्रफित तयार केलीय.मोबाईलवर व्यस्त असताना आजच्या पिढीला कसलंच भान राहत नाही.याचंच एक उदाहरण म्हणून इथल्या नागरिकांनी ही चित्रफित तयार केलीय.या चित्रफितीत गणपती बाप्पा आणि उंदीर यांचा संवाद दाखवलाय. ज्यात बाप्पाला नेटवर्क फेल अशा गोष्टींना सामोरं जाव लागतंय. मोबाईलचा होणारा दुरुपयोग या चित्रफितीत अत्यंत हुशारीने हाताळण्यात आलाय. तरुण-तरुणी कशाप्रकारे मोबाईलचा वापर करतात आणि मोबाईलमध्ये किती व्यस्त असतात हे ही दाखवण्यात आलंय. मोबाईलमुळे अपघात होतात हे ही अगदी बारकाईने या चित्रफितीत दाखवण्यात आलंय. या मंडळाने अशी चित्रफित बनवून एकप्रकारे नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.

ही चित्रफीत पूर्ण पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/watch?v=-h4modREDVo&feature=youtu.be

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा