फॅशन स्ट्रीटचा ‘श्रीगणेशा’

 Fort
फॅशन स्ट्रीटचा ‘श्रीगणेशा’

सीएसटी - सीएसटी एम.जी.रोड परिसरातल्या फॅशन स्ट्रीट येथील एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा श्रीगणेश शिवलिंगाच्या गुंफेत विराजमान झाला आहे. पूर्वी इथे मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहत होती. जागेचा विकास होत गेला तसं इथल्या रहिवाशांचं एमएमआरडीएनं मानखुर्द परिसरात पुर्नवसन केलं. आजही इथले विस्थापित रहिवासी गणेशोत्सव साजरा करत असून यंदा मंडळाचं 35 व्या वर्षात पदार्पण झालं आहे. यातले अनेक रहिवासी हे फॅशन स्ट्रीटमधले दुकानदार आहेत. यंदा मंडळाकडून या दुकानदारांच्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय.

 

Loading Comments