वाचनालयाची झाली कचरापेटी !

Sham Nagar
वाचनालयाची झाली कचरापेटी !
वाचनालयाची झाली कचरापेटी !
वाचनालयाची झाली कचरापेटी !
See all
मुंबई  -  

जोगेश्वरी - ओशिवरा जोगेश्वरी पश्चिम परिसरातील हिरा पन्ना मॉल परिसरात कचरा टाकण्यासाठी ठेवलेले डबे हटवून वाचनालय उभारण्यात आलंय. आनंद नगर परिसरातील रहिवाशांसाठी हिरा पन्ना मॉल आणि शेरेनटी बिल्डिंगसमोर कचरा डब्यांची सोय करण्यात आली होती.

एका राजकीय पक्षाच्या वरदहस्तानं येथील कचरा पेट्या रातोरात हटवण्यात आल्यात. तेथे वाचनालय उभारण्यात आलंय. मात्र कचरा पेट्यांच्या जागी वाचनालय उभारण्यात आल्यानं स्थानिकांची गैरसोय होतेय. तसंच काही जणांकडून महापुरुषांच्या पुतऴ्यांसमोर कचरा टाकण्यात येतोय. 
येथील कचरा पेट्या हटवण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होतेय. काही वर्षांपूर्वी सिने अभिनेत्री राखी सावंत हिनं कचरा पेटी हटवण्यासाठी मनपा मुख्य कार्यालय समोर निदर्शन केली होती. मात्र तत्कालीन नगरसेविका राजूल सुरेश पटेल यांनी स्थानिक जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्याच ठिकाणी कचरा डबे ठेवण्याची व्यवस्था करून दिली होती. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.