लालबाग राजाला अखेरचा निरोप...

Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - लालबागच्या राजाचा तब्बल 21 तासांनंतर आज सकाळी 7.30 च्या सुमारास अरबी समुद्रात मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी विसर्जनादरम्यान गृहराज्यमंत्री दीपक केसरकरही सहभागी झाले होते. यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा लवकर सहाच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. राजाच्या विसर्जनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावती होती. तसेच अनेक कोळी बाधंवानी सलामी दिली. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मरिन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. मात्र समुद्राला ओहोटी असल्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन काही काळ लांबले.

Loading Comments