पोलिसांनो ट्राफिक नियम पाळा नाहितर...

 Dahisar
पोलिसांनो ट्राफिक नियम पाळा नाहितर...
Dahisar, Mumbai  -  

कायदा हा सर्वांसाठी समान असतो. कायद्यापुढे कुणी मोठं नाही किंवा छोटं नाही. आणि याचचं उदाहरण दिलं साकिनाका पोलीस स्टेशनचे डिसीपी विनायक देशमुख यांनी. ट्राफिक नियम तोडल्यानं डिसीपी विनायक देशमुख यांनी स्वत:च्या कार्यालयातल्या दोघा पोलीस हवालदारांचं चालन कापलं. शब्बीर पटेल आणि धम्मपाल सरपाते यांच्यावर डिसीपीनं हेल्मेट न घातल्यानं कारवाई केली. तसंच कार्यालयातल्या सर्व पोलिसांना ट्राफिक नियम पाळण्याची ताकिद दिली. पण दुसरीकडे दहिसर पोलीस स्टेशनमधले पोलीस मात्र ट्राफिक नियमांची  पायमल्ली करत आहेत. मुंबई लाईव्हच्या हाती लागलेल्या या दृष्यांमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे पोलीस विना हेल्मेट प्रवास करत आहेत. त्यामुळे नियम शिकवणारे हे पोलिसच नियम धाब्यावर बसवत आहेत.

Loading Comments