Advertisement

आरटीआयने केला पर्दाफाश, कारवाई कधी?


आरटीआयने केला पर्दाफाश, कारवाई कधी?
SHARES

महापालिकेच्या भाडे संकलन या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची गेल्या 11 वर्षात एकदाही बदली झालेली नाही. संजय कदम हे परळ येथील एफ दक्षिण विभागात भाडे संकलक पदावर काम करत आहेत. गेल्या 11 वर्षात नियमानुसार त्यांची एकदाही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे कदम यांच्या माध्यमातून पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक मलिदा मिळत असल्यामुळे बदली थांबल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. नियमानुसार बदली करण्यात आली नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मिलिंद तांबे यांनी यासंदर्भात आरटीआयअंतर्गत माहिती मागवली होती. त्यानुसार कदम हे पालिकेच्या मुद्रणालयात वितरक पदावर कार्यरत होते. त्यानंतर 2003मध्ये वसुली सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याकाळात त्यांनी पदाचा गैरवापर करत एसआरए योजनेमध्ये परिशिष्ट 2 मध्ये अनेक बोगस लोकांना सामावून घेतले. अनेकांना स्वतःच्या सह्यांचे फोटोपास पारित केले आहेत. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यांच्यावर कायदेशी कारवाई करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा