एका अक्षराचा घोळ...

 Churchgate
एका अक्षराचा घोळ...

आझाद मैदान - आझाद मैदानात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाकडून गेल्या महिन्याभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश(सुधारणा) कायदा 1950 व 1976 चा कायदा क्र.108 नुसार ओरान आणि धनगड या जातींचा अनुसूचित जमातीत उल्लेख आहे. मात्र प्रमाणपत्रांवर ‘धनगड’ऐवजी ‘धनगर’ असा उल्लेख असल्यामुळे गेल्या 65 वर्षांपासून हा समाज आरक्षणापासून वंचित राहिलाय. त्यामुळे कायद्यानुसार आम्हालाही अनुसूचित जमातीसाठीचं आरक्षण मिळावं आणि ‘एसटी’चे दाखले देण्यात यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Loading Comments