बाप्पाच्या आगमनाला ढोलताशा सज्ज

 Malad West
बाप्पाच्या आगमनाला ढोलताशा सज्ज
बाप्पाच्या आगमनाला ढोलताशा सज्ज
view all

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरुये. मग त्यात ढोलताशा पथक तरी मागे कशी राहतील. मालाड इथल्या सोमवार बाजार परिसरातील रणझुंजार प्रतिष्ठानही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहे. रणझुंजार प्रतिष्ठाननं त्यांच्याकडे असलेल्या ढोल ताशाच्या डागडुजीला सुरुवात केलीय. जेणेकरून बाप्पाचा आगमन सोहळा पारंपारिक पद्धतीनं ढोलताशाच्या गजरात होईल.

Loading Comments