राजकीय पक्षांचे दिवाळी फराळांचे स्टॉल

 Dadar
राजकीय पक्षांचे दिवाळी फराळांचे स्टॉल
राजकीय पक्षांचे दिवाळी फराळांचे स्टॉल
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - दादर कबुतरखाना, सेनाभवन परिसर, डिसिल्व्हा शाळा परिसरात अनेक राजकीय पक्षांनी दिवाळीचे निमित्त साधून दिवाळी फराळाचे स्टॉल लावले आहेत. या सर्व स्टॉलच्या तुलनेत शिवसेनेच्या स्टॉलचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे. या स्टॉलवर ठेवण्यात आलेले खाद्यपदार्थांच्या किंमती बाजार भावापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. यामध्ये अनेक स्टॉलवर घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या चकल्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. घरगुती पोहे चिवडा 200 रुपये किलो, जैन चिवडा 200 रुपये किलो, शेव 200 रुपये किलो, गाठे 200 रुपये किलो, साधी चकली 200 रुपये किलो, भाजनी चकली 300 रुपये किलो, शंकर पाळी 200 रुपये किलो, करंजी 300 रुपये किलो, बेसन लाडू 15 रुपये नग अशा या किंमती आहेत. त्यामध्ये भाजनीच्या चकल्या महिला अधिक प्रमाणात खरेदी करतात, अशी माहिती शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी कोमल परब-शेट्ये यांनी दिली. 

Loading Comments