कांदिवलीतल्या हिरानंदानी टॉवरला आग

Kandivali, Mumbai  -  

कांदिवली-  आज सर्वत्र विसर्जनाची धामधुम असताना कांदिवलीतील एस. व्ही. रोडवरील हिरानंदानी टॉवर मात्र आगीत धुमसत होते. दुपारी एकच्या दरम्यान हिरानंदानी टॉवरच्या 32 व्या मजल्याला आग लागली. आग बरीच मोठी असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या, 7 वॉटर ट्रक आणि 2 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत. आग लागल्याबरोबर काही मिनिटांतच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आल्याने येथे कोणतीही जिवित हानी झालेली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगितले जात आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन यश आलेले नसले तरी आग आटोक्यात येत आहे.

 

Loading Comments