चोरी करणारे 5 सिनियर सिटिझन गजाआड

 Dahisar
चोरी करणारे 5 सिनियर सिटिझन गजाआड

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणी सोन्या चांदीच्या दुकानात चोरी करणाऱ्या एका सिनियर सिटिझन टोळीतल्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळक्यांनी आतापर्यंत 50 ज्वेलरीची दुकाने लुटली आहेत. चोरटे खरेदीचा बनाव करून ज्वेलरीच्या दुकानात शिरायचे आणि दागिने लंपास करून पळ काढायचे. यावेळी त्यांनी मालाडच्या कुरार पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या एका दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकाने सतर्कता दाखवत पोलिसांकडे तक्रार केली. यामध्ये विठोबा महिपती पवार, वासुदेव नामदेव शिंदे, गंगुबाई पवार, विजय विठोबा पवार आणि विमल जाधव यांना अटक करण्यात आले असून तीन जण अद्याप फरार आहेत. 

Loading Comments