'खड्ड्यांमध्येच गणपती विसर्जन करणार'

 Bandra west
'खड्ड्यांमध्येच गणपती विसर्जन करणार'
Bandra west, Mumbai  -  

वांद्रे पूर्वेकडील रस्त्यावर  खड्डेच खड्डे पडले आहेत. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे सफाई कामगार नेते राजेश सावनेर यांनी मनपाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गणेशोत्सवापूर्वीच सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासन महानगर पालिकेच्यावतीने देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवाला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. जर गणेश विसर्जनापर्यंत  पालिकेने खड्डे बुजवले नाहीत तर या खड्ड्यांमध्येच गणपती विसर्जन करण्याचा इशारा  अनेक मंडळांनी दिला आहे .  

 

 

 

Loading Comments